
पुणे : ‘‘एका गाण्याच्या ओळी आहेत, ‘जेव्हा भेटेल मी गुन्ह्यात, मला अटक करा पुण्यात’ अगदी त्याचप्रमाणे बीडमधील सगळे आरोपी पुण्यातच सापडत आहेत. ‘पुणे तिथं काय उणे’, आता काहीच उरलं नाही. हे कुणामुळे झाले तर या वाल्मीक कराडमुळे. या ‘गँग्ज् ऑफ परळी’मुळे पुण्याचे नाव खराब होईल,’’ असा घणाघात आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी रविवारी पुण्यात केला.