
पैठण : (जि. छत्रपती संभाजीनगर) आका’वर एक ‘आका’ असून, तो मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील प्रमुख आहे. हा मोठा ‘आका’ तुरुंगामध्ये जाईल, तेव्हा ‘आका’कडून अन्याय झालेले लोक आवाज उठवतील, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा तोफ डागली. थेट नाव न घेता त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.