Police Van Carrying Kute Couple Meets with Accident Near Neknur
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Beed Accident : ज्ञानराधा बँक घोटाळ्यातील आरोपी सुरेश आणि अर्चना कुटे यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात; नेकनूरजवळ थरार!
Kute Couple Police Van Accident : ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळ्यातील आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा नेकनूर-येळंब रस्त्यावर अपघात झाला असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नितीन चव्हाण
बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे व त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड येथे घेऊन जात असताना पोलिस व्हॅनचा अपघात झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी नेकनूर-येळंब रस्त्यावर सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

