Sushma Andhare : ठाकरे गटामध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता; सुषमा अंधारेंच्या विधानाने भूवया उंचावल्या

Sushma Andhare
Sushma Andharesakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं. महत्त्वाचं म्हणजे ही भेट येणाऱ्या काळातल्या चांगल्या पक्षप्रवेशासाठी होती, असं अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

सुरुवातीला मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबद्दल सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपमध्ये नकारात्मकता इतकी वाढलेली आहे की ते काहीही करु लागले आहेत. सरकारमध्ये अजितदादा गेल्यामुळे शिंदे आणि भाजपमध्ये धुसफूस वाढलेली आहे. म्हणूनच ते कोणत्याही निवडणुकीला सामोरे जात नाहीत.

Sushma Andhare
Mumbai University Election : मुंबई विद्यापीठ निवडणुकीत ठाकरेंना बसू शकतो फटका; 'या' नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

धनंजय मुंडेंबद्दल बोलतांना अंधारे म्हणाल्या की, मी माहिती घेतली आणि कळले राष्ट्रवादीला दमदार व्यक्तिमत्त्व मराठवाड्यात मिळाले आहे. महाविकास आघाडी म्हणून बबग गित्ते यांचं मी स्वागत करते. कदाचित तेच परळीतले उमेदवार असू शकतात.

Sushma Andhare
Highest Fighter Jet Base: लडाखमध्ये भारत बनवणार जगातील सर्वात मोठा रस्ता, बोगदा अन् फायटर जेटचा बेस; BROनं सांगितला सविस्तर प्लॅन

अंधारे पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात एक चांगला पक्षप्रवेश असेल आणि त्यासाठीच मी 'मातोश्री'वर आले होते. शिंदे गटातले लोकं आता काहीही बोलू शकतात म्हणजे डोनाल्ड ट्रम्पही संपर्कात आहे, असेही म्हणू शकतात. असा टोला त्यांनी लगावला. येणाऱ्या काळामध्ये ठाकरे गटात कुणाचा पक्षप्रवेश होणार? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com