Sushma Andhare : उर्फी प्रकरणात अंधारेंची उडी; कंगना, केतकी अन् अमृता फडणवीसांचे नाव घेत म्हणाल्या…

sushma andhare defend Uorfi Javed against chitra wagh says Can you object  outfits of Kangana Ketaki or amruta fadnavis
sushma andhare defend Uorfi Javed against chitra wagh says Can you object outfits of Kangana Ketaki or amruta fadnavis

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. या दरम्यान शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतली आहे.

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा थेट सवाल उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशारा देणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना केला आहे.

अंधारे काय म्हणाल्या आहेत?

"सुषमा अंधारे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत की, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट."

"पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच..."

"अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" असा सवालही त्यांनी केला आहे.

sushma andhare defend Uorfi Javed against chitra wagh says Can you object  outfits of Kangana Ketaki or amruta fadnavis
Video : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक? अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्टीकरण

"जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?" असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

sushma andhare defend Uorfi Javed against chitra wagh says Can you object  outfits of Kangana Ketaki or amruta fadnavis
Viral Video : शेतकरी जोमात, पाहाणारे कोमात; हार्ले डेव्हिडसनवर घालतो रतीबाचे दूध!

शेवटी त्यांनी, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल असा प्रश्नही विचारला आहे.

वेगवेगळ्या वेषभूषेवरून चर्चेत असणाऱ्या उर्फी विरोधात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे चाळे आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ, पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. आता तरीही उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशारा त्यांनी दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com