Sushma Andhare: 'अब्दुलभाई, तुम्ही घरवालीचे तरी ...?' सुषमा अंधारेंचा सत्तांरांवर थेट वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare: 'अब्दुलभाई, तुम्ही घरवालीचे तरी ...?' सुषमा अंधारेंचा सत्तांरांवर थेट वार

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आहे. दरम्यान मागच्या काही दिवसात अब्दुल सत्तार आपल्या वक्तव्यामुळे मोठ्या वादात सापडले होते. त्यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर टीका केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आज सिल्लोडमध्ये सुषमा अंधारे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली आहे. या महाप्रबोधन यात्रेत बोलताना अंधारे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की, कधी कधी संशय येतो, अब्दुलभाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का? सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल भाई लोक तुमची लायकी ठरवत आहेत. त्यांना काही फरक पडत नाही. जे लोक जितेंद्र आव्हाड यांच्यावर केस दाखल करतात, तेच लोक सत्तार आणि गुलाबरावांना गुळगुळीत भाषेत समजावतात. देवेंद्र फडणवीसांना हे कळत नाही, की ते पक्षाचे नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. कधी कधी वाटत देवेंद्र फडणवीस यांना ठरवून बोलायला सांगत असतील. अशा शब्दात अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे. परंतु या भाषेत बोलल्यामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Sudhanshu Trivedi: “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जर तुम्ही सत्तारांना हिंदूत्वासाठी घेऊन गेले तर जेव्हा तुम्ही गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सत्तार कुठे होते? तुम्हाला इस्लाम काय आहे कळतो का? असा सवलही करत इस्लाम धर्माचे पाच फर्ज काय आहेत ते सांगितले. तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलत आहात तुम्ही काय इमानच्या गोष्टी करता? अब्दुल भाईला बोलायला पत्त्यांची भाषा लागते एकीकडे एक्का, दुसरीकडे छक्का. सिल्लोड ते औरंगाबाद रोड काचेसारखा आहे म्हणून मला वेळ लागला असा टोलाही सुषमा अंधारे यांनी यावेळी लगावला आहे.