esakal | ब्रेकिंग! 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहूजन आघाडीत प्रवेश 
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash-Ambedkar-and-Raju-Shetti - Copy.jpg

सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ घाडगे- देशमुख, सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश सचिव जावेद पटेल, श्रीमंत जाधव, बाळासाहेब तांबे यांनी वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला. वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते चंदनशिवे यांनी त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

ब्रेकिंग! 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहूजन आघाडीत प्रवेश 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ घाडगे- देशमुख, सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश सचिव जावेद पटेल, श्रीमंत जाधव, बाळासाहेब तांबे यांनी वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला. वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते चंदनशिवे यांनी त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित आघाडीच्या महिला महासचिव माजी नगरसेविका उषा शिंदे होत्या. यावेळी बबन शिंदे, श्‍याम शिंगे, शिवाजी बनसोडे, गोपाळ घाडगे-देशमुख, नाना कदम, सोहन लोंढे, श्रीमंत जाधव, जावेद पटेल, रेश्‍मा मुल्ला, उषा शिंदे, नगरसेविका ज्योती बमगोंडे, मंदाकिनी शिंगे, हेमलता वाघमारे, पल्लवी सुरवसे, सुजाता वाघमोडे, रवी थोरात, चंद्रकांत सोनवणे, विनोद इंगळे, संतोष वाघमारे, किर्तीकुमार शिवशरण, आकाश कुचेकर, विश्‍वास शिंदे, सोहन लोंढे, विजय बमगोंडे, आनंद तांबे, विष्णू जाधव, धनंजय जगदाळे, धनंजय मुक्‍ते, चंद्रशेखर मडीखांबे, गौतम चंदनशिवे, अविनाश भडकुंबे, सुरज गायकवाड, उमेश रणदिवे, धम्मपाल मैंदर्गीकर, अतिश गवळी, वैभव गवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध वाघमारे यांनी केले. तर नगरसेवक गणेश पुजारी यांनी आभार मानले. 

अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज गरज आहे. महाराष्ट्राच्या संयुक्‍त चळवळीत त्यांचे मोठे कार्य आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांनी केली.