साताऱ्यातील सभेत पवारसाहेब भिजले, पण शेतकरी विरघळला : राजू शेट्टी

Sharad Pawar vs Raju Shetty
Sharad Pawar vs Raju Shettyesakal
Summary

'महाविकास आघाडी सोबत यावं म्हणून शरद पवारांनी विनंती केली होती.'

कोल्हापूर : महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) खदखद राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या रुपात अखेर बाहेर पडलीय. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथून आज निर्णय जाहीर करत स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलंय.

राजू शेट्टी हे पाठीमागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याच्या बातम्या सातत्यानं येत होत्या. या बातम्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. आजपासून महाविकास आघाडीसोबतचं सर्व संबंध संपल्याचं मी आपल्यावतीनं जाहीर करतो. आजवर दिल्लीवाल्यांनी फसवलं, आता मुंबईवाल्यांनीही फसवलं. त्यामुळं येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ आणि स्वत:च्या मनगटाच्या बळावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असं राजू शेट्टींनी म्हंटलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक कोल्हापुरात आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला.

Sharad Pawar vs Raju Shetty
सोमय्यांकडं किती लक्ष द्यायचं हे ठरवण्याची वेळ आलीय : शंभूराज देसाई

राजू शेट्टी पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं असं साताऱ्यातील सभेत शरद पवारसाहेब भिजत-भिजत सांगितलं होतं. पवारसाहेब भिजले, पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलीय. आता रोज ईडीच्या चौकशी बद्दल ऐकतोय, माझं ईडीच्या (ED) प्रमुखांना सांगणं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना हजारो कोटींचा चुना लावत आहेत. त्याचे पुरावे आणि तक्रारी मी केली आहे. मग याचा तपास का होत नाही? असा सवालही त्यांनी केलाय. आम्ही कधी एनडीएच्या मागे लागलो नाही आणि महाविकास आघाडीच्याही मागे लागलो नाही. एनडीएसोबत यावं यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विनंती केली आणि महाविकास आघाडी सोबत यावं म्हणून शरद पवारांनी विनंती केली, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com