मुनमुन दत्ताच्या वादग्रस्त विधानानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

सोशल मीडियावर मुनमुन होतेय ट्रोल
मुनमुन दत्ताच्या वादग्रस्त विधानानंतर भन्नाट मीम्स व्हायरल
Updated on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता (munmun dutta) सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. जातीवाचक वक्तव्य केल्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्यातच आता तिला अटक करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. म्हणूनच, या प्रकरणी मुनमुनने जाहीररित्या माफीदेखील मागितली. तरीदेखील नेटकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुनमुनला अटक करण्याच्या मागणीसोबतच सोशल मीडियावर काही भन्नाट मीम्सदेखील व्हायरल झाले आहेत. या मीम्समध्ये जेठालालची सध्यपरिस्थिती नेमकी कशी असेल हे मजेशीर अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (taarak mehta ka ooltah chashmah babita ji actress munmun dutta memes viral)

सध्या सोशल मीडियावर #ArrestMunmunDutta हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या ट्रेण्ड अंतर्गत अनेकांनी मुनमुनला अटक करण्याची मागणी केली आहे. तर, काहींनी याच ट्रेण्डमध्ये काही मीम्स शेअर केले आहेत.

मुनमुन दत्ताच्या वादग्रस्त विधानानंतर भन्नाट मीम्स व्हायरल
तुरटीच्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो?

नेमकं काय आहे प्रकरण?

अलिकडेच मुनमुनने तिच्या मेकअप ट्युटोरिअलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मेकअप टीप्स देत असतांना तिने एका जातीचा उल्लेख करत खिल्ली उडवली. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त करत तिला अटक करण्याची मागणी केली. मात्र, या संपूर्ण प्रकारानंतर तिने जाहीररित्या माफीदेखील मागितली आहे. "कोणालाही दुखावण्याचा किंवा कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र, जे झालं ते मी कोणत्याही जाणीवपूर्वक हेतूने केलं नव्हतं. त्यामुळे माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर, मी मनापासून माफी मागते", असं म्हणत तिने माफी मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com