Tadoba Tiger Video Viral: ताडोबाची सफाई करतानाचा 'वाघोबाचा' व्हिडीओ व्हायरल

Tadoba Tiger Video Viral: प्राणी खूप हुशार असतात. कधी-कधी ते असे काम करतात की माणूसही शरमेने झुकते. अशातच एक व्हिडीओ सोशल मिडीयावप व्हायरल होत आहे.
Tadoba Tiger Video Viral
Tadoba Tiger Video ViralEsakal

प्राणी खूप हुशार असतात. कधी-कधी ते असे काम करतात की माणूसही शरमेने झुकते. अशातच एक व्हिडीओ सोशल मिडीयावप व्हायरल होत आहे. वन्यजीव प्रेमी दीप काठीकर यांच्या कॅमेरात हा व्हिडिओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोस्ट केलेला हा व्हिडीओ एका जंगलातील आहे, ज्यामध्ये एक वाघ पाण्यामधून प्लास्टिकची बाटली उचलून अशा ठिकाणी फेकतो आहे की अनेक लोक वाघाचे कौतुक करताना दिसत आहेत. (Marathi Tajya Batmya)

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात एक वाघिण तोंडात प्लास्टिकची बाटली पाण्यातून बाहेर काढतानाचा एक व्हिडिओसमोर समोर आला आहे. नयनतारा असं या वाघिणीचे नाव आहे. छोटा मटका वाघ आणि भानुसखिंड वाघिण यांची ही नयनतारा.(Latest Marathi News)

Tadoba Tiger Video Viral
Plane Door Falls : धक्कादायक! विमान हवेत असतानाच निखळला दरवाजा; 'या' आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

नयनतारा ही वाघीण निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. नयनतारा वाघीण पाणवठ्यावर पाणी प्यायला गेली असताना तिला तिथे पाण्यात बाटली दिसली. तिने ती पाण्याची बाटली पाण्याबाहेर काढली. वन्यजीव प्रेमी दीप काठीकर यांच्या कॅमेरात हा व्हिडिओ कैद झाला आहे. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.आत्तापर्यंत दीप काठीकर यांच्या पोस्टला 12,983 हजार लाईक्स मिळाले आहेत.

पर्यटनासाठी गेलेले अनेकजण गेलेल्या ठिकाणी कचरा करतात. पर्यटनाच्या ठिकाणी अनेकदा कळत- नकळत प्लास्टिक आणि कचरा टाकतो. तो न टाकता स्वच्छता राखण्याचे आवाहन वारंवार पर्यावरण प्रेमी करतात.

Tadoba Tiger Video Viral
Rapido Rider : माणुसकी संपली का? पेट्रोल संपल्यावर बाईकवरून उतरण्यास नकार, रॅपिडो चालकाचा गाडी ढकलतानाचा Video Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com