टॅक्सीचालकाने का अडवली सुप्रिया सुळे यांची वाट?

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

मुंबई : दादर स्थानकात टॅक्सी चालकांच्या मुजोरपणाचा अनुभव आत्तापर्यंत आपल्याला आला असेलच. मात्र, आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. टॅक्सीचालकाने सुप्रिया सुळे यांची वाट अडवली.

कुलजित सिंह मल्होत्रा असे संबंधित टॅक्सी चालकाचे नाव आहे. तो अचानक ट्रेनमध्ये घुसला आणि टॅक्सी हवी आहे का? अशी विचारणा करत ओरडू लागला. त्याने आपली वाट अडवली आणि आपल्याला नाहक त्रास दिला, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटवरून सांगितले. सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली असून रेल्वे मंत्रालयाकडे तक्रारही केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी लिहिले, की दादर स्थानकावर मला एक अजब अनुभव आला. कुलजित सिंह मल्होत्रा नावाची एक व्यक्ती अचानक ट्रेनमध्ये घुसली आणि टॅक्सी हवी आहे का विचारत ओरडू लागली. दोनवेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता अडवला आणि नाहक त्रास दिला. यानंतरही निर्लज्जपणे तो फोटो काढण्यासाठी पोज देत होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taxi Driver Misbehave with MP Supriya Sule