यंदा ‘शिक्षक दिनी’ पुरस्कार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Day 5 September

यंदा ‘शिक्षक दिनी’ पुरस्कार नाही

नंदोरी : केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. मात्र, राज्यातील शिक्षकांच्या पुरस्काराची अंतिम यादी अद्याप निश्चित झाली नाही. त्यामुळे यंदा राज्यातील आदर्श शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा ‘शिक्षक दिन’ ५ सप्टेंबरचा मुहूर्त हुकला आहे.

२०२१-२२च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराच्या निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्तीच २९ ऑगस्टला करण्यात आली.

शिक्षक दिनाच्या आठ दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आल्याने यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त हुकणार हे निश्चितच होते. राज्यातील १०९ शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यंदा अद्याप नावे निश्चित झाली नाहीत.

दोन वर्षांपासून पुरस्कार रखडले

कोरोना साथीच्या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. शिक्षकांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. मात्र, गत दोन वर्षे राज्यातील शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळालाच नाही. गेली दोन वर्षे राज्यातील शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहीले. आदर्श शिक्षक पुरस्कार छाननी समितीवर दोन अशासकीय तज्ज्ञांची निवड केल्याने अद्याप अंतिम यादी झाली नाही.

Web Title: Teacher Day 5 September No Award This Year Final List State Level Ideal Teacher Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..