शिक्षकांची पंचाईत ! वेतनासाठी आता कोरोना ड्यूटी केल्याचा दाखला बंधनकारक

तात्या लांडगे
Saturday, 3 October 2020


दाखल्याशिवाय वेतन देऊ नये; संबंधितांना दिले पत्र
कोरोना काळात शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ड्यूटी करण्याचे आदेश आल्यानंतर शिक्षकांनी ड्यूटी केल्याचा दाखला संबंधित नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नियंत्रण अधिकाऱ्यांचा दाखला जोडल्याशिवाय वेतन देऊ नये, असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शिक्षकांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने तसे अधिकार जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्‍तांना देण्यात आले आहेत. तरीही या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात कोरोना ड्यूटी नाकारणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. त्यामुळे आता शिक्षकांना वेतनासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांनी कोरोनाची ड्यूटी केल्याची नोंद त्या दाखल्यावर असणार आहे.

 

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 लाखांवर पोहचली असून मृतांची संख्येनेही 37 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात बुलढाणा, जळगाव, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, धुळे, नंदूरबार, नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आलेख वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची खबरदारी घेऊन ठोस उपाययोजना करण्याच्या सक्‍त सूचना शासन स्तरावरुन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे 'कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत घरोघरी सर्व्हे केला जात असून रुग्ण व मृत्यू आटोक्‍यात यावेत म्हणून को- मॉर्बिड व्यक्‍तींचाही सर्व्हे सुरु आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी शिक्षकांनी किमान 30 दिवसांची ड्यूटी करावी, याची कार्यपध्दती निश्‍चित करण्यात आली आहे. तरीही कोरोना ड्यूटी नकोच म्हणत अनेक शिक्षकांनी ड्यूटीच नाकारली आहे.

दाखल्याशिवाय वेतन देऊ नये; संबंधितांना दिले पत्र
कोरोना काळात शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ड्यूटी करण्याचे आदेश आल्यानंतर शिक्षकांनी ड्यूटी केल्याचा दाखला संबंधित नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नियंत्रण अधिकाऱ्यांचा दाखला जोडल्याशिवाय वेतन देऊ नये, असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

ठळक बाबी...

  • जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांकडे शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार
  • प्रत्येक शिक्षकाला किमान 30 दिवसांची ड्यूटी करण्याचे बंधन
  • प्राथमिक, माध्यमिक वेतन अधिक्षक आणि मुख्याध्यापक, महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांना आयुक्‍तांचे पत्र
  • नागरी आरोग्याधिकारी तथा नियंत्रण अधिकाऱ्याच्या दाखल्याशिवाय आता शिक्षकांना वेतन नाही
  • कोरोना ड्यूटी नाकारणाऱ्या शिक्षकांवर शास्तीची कारवाई; सेवा पुस्तिकेतही होणार कर्तव्यात कसुरीची नोंद

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To teachers certificate of corona duty now mandatory for salary