मोठी बातमी! 'या' दिवसापासून सुरु होणार महाविद्यालये; प्रवेश प्रक्रियेविषयी जाणून घ्या... 

तात्या लांडगे
Friday, 3 July 2020

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्रानुसार... 

 • 1 ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम, तर प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास 1 सप्टेंबरपासून होणार प्रारंभ 
 • महाविद्यालयांनी आपापल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करावा प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा अर्ज 
 • टाळेबंदी उठल्यानंतर विद्यार्थी अध्यापनास आल्यानंतर मूळ कागदपत्रे पडताळून त्यांचा प्रवेश निश्‍चित करावा 
 • महाविद्यालये सुरु झाल्यानंतर सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल 
 • मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक; स्वच्छतागृहांमध्ये पुरेशा सोयी-सुविधा करुन नियिमत करावी स्वच्छता 
 • नियमांचे सूचना फलक महाविद्यालय परिसरात व क्‍लासरुममध्ये लावाव्यात 

सोलापूर : राज्यातील कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढत असून भविष्यात त्यात सुधारणा होण्याची आशा आहे. मात्र, तरीही राज्यातील काही भागातून कोरोना 100 टक्‍के हद्दपार होईल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न बोलावता ऑनलाइन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करुन द्यावा, असे पत्र मुख्य सचिवांनी विद्यापीठांना पत्र पाठविले आहे. टाळेबंदी उठल्यानंतर 1 ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनास सुरवात करण्याचे नियोजन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आश्‍वासित प्रवेश दिला जाणार आहे. तर गैरहजर व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षात तथा सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीनेच महाविद्यालय स्तरावर राबवावी, असेही मुख्य सचिवांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही भरण्याची सोय ऑनलाइन करुन द्यावी, टप्प्याटप्याने शुल्क घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

बॅगलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याचेही नियोजन
राज्याच्या मुख्य सचिवांनी पाठविलेल्या पत्रानुसार विद्यापीठाने आता 1 ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरु करण्याचे नियोजन केले आहे. तर 1 सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरु होतील. त्यानुसार बॅगलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याचेही नियोजन सुरु आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंबंधी व पुढील उपाययोजनांबद्दल सर्व महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. 
- डॉ. विकास घुटे, कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्रानुसार... 

 • 1 ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम, तर प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास 1 सप्टेंबरपासून होणार प्रारंभ 
 • महाविद्यालयांनी आपापल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करावा प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा अर्ज 
 • टाळेबंदी उठल्यानंतर विद्यार्थी अध्यापनास आल्यानंतर मूळ कागदपत्रे पडताळून त्यांचा प्रवेश निश्‍चित करावा 
 • महाविद्यालये सुरु झाल्यानंतर सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल 
 • मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक; स्वच्छतागृहांमध्ये पुरेशा सोयी-सुविधा करुन नियिमत करावी स्वच्छता 
 • नियमांचे सूचना फलक महाविद्यालय परिसरात व क्‍लासरुममध्ये लावाव्यात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teaching of second and final year students starts from 1st August