sakal social foundation
sakal social foundationsakal

एचआयव्हीबाधितांसाठी आशेची ‘पालवी’

‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह हा शब्द उच्चारताच लोकांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. एचआयव्हीबाधितांना नातेवाईक आणि समाजाच्या अवहेलनेला व भेदभावाला सामोरे जावे लागते.

‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह हा शब्द उच्चारताच लोकांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. एचआयव्हीबाधितांना नातेवाईक आणि समाजाच्या अवहेलनेला व भेदभावाला सामोरे जावे लागते. अशा समाजाने नाकारलेल्या एचआयव्हीबाधित मुलांच्या विकासासाठी त्यांचा आपलेपणाने सांभाळ करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील समाजसेविका मंगल शहा व मुलगी डिंपल घाडगे यांनी २००१ मध्ये पंढरपूर- कराड रस्त्यावर ‘प्रभा हिरा प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून एचआयव्हीबाधित मुलांच्या संगोपनासाठी ‘पालवी’ प्रकल्प सुरू केला.

वीस वर्षांपूर्वी दोन बालकांवर सुरू झालेल्या या प्रकल्पात आज एकशे सव्वीसहून अधिक बालके राहत आहेत. केवळ एचआयव्हीग्रस्त बालकेच नव्हे तर एचआयव्हीग्रस्त तरुण मुले, महिला अशा सगळ्यांसाठी हा प्रकल्प म्हणजे हक्काचे, मायेचे आणि सुरक्षित ठिकाण झाले आहे. ‘पालवी’ प्रकल्पात एचआयव्हीबाधित बालकांचा आहार, निवास, वैद्यकीय उपचार, शिक्षण व स्वावलंबन हे उपक्रम राबवले जातात. या संस्थेने पाचशेहून अधिक बालकांचे संगोपन करून त्यांना स्वावलंबी केले.

‘पालवी’ प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात मंगलताई व कन्या डिंपल यांना अडचणींचा सामना करावा लागला. पण समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने ‘पालवी’ प्रकल्पाला आकार येऊन मुलांसाठी बालवाडी ते दहावी शाळा झाली. सत्तर व ऐंशी टक्के गुण घेऊन ही मुले दहावी पास होत आहेत. याशिवाय प्रकल्पात मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व औषधोपचारांची सोय झाली.

मुलांचे संगोपन, आरोग्य व त्यांच्या शिक्षणासोबतच एचआयव्हीग्रस्त तरुणांना त्यांच्या आवडीप्रमाणे काम देऊन मानधनसुद्धा दिले जाते. एचआयव्हीबाधित तरुण व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना शिलाई काम, शेतीकाम, प्लंबिंग, कागद काम व इतर व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

सामूहिक मदतीची गरज

सद्यःस्थितीत ‘पालवी’ संगोपन प्रकल्पाच्या दैनंदिन खर्चासाठी यामध्ये मुलांचा नाष्टा, जेवण, शिक्षण व औषधोपचार यावर होणारा खर्च अधिक असून, संस्थेला सामूहिक मदतीची गरज आहे. एका मुलाचा खर्च जवळपास दोन हजार पाचशे रुपये आहे. तेवढ्या रक्कमेची देणगी देऊन आपण एका मुलाचा खर्च उचलू शकता. याशिवाय निवासी व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. एचआयव्हीबाधित मुलांचे आयुष्य घडविणाऱ्या ‘पालवी’ ला मदत करू शकता.

अशी करा मदत...

‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘पालवी’ प्रकल्पाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन , प्रकल्पाची व ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येकास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

किंवा खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता. ऑनलाइन देणगी बँक खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सअॅप नंबरवर ट्रान्झॅक्शन तपशील पाठवावेत.

Name : Sakal Social Foundation

Bank A/C Number : ०४५९१०४०००११७८५२

Name of Bank :

IDBI bank, Laxmi Road, Pune

IFSC Code : IBKL००००४५९

अधिक माहितीसाठी संपर्क ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com