
Tejaswini Pandit: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरुन दोन्ही भावांचं मनोमिलन झालेलं आहे. राजकीयदृष्ट्या हे दोघे भाऊ काय भूमिका घेतात, हे पहाणंदेखील महत्त्वाचं आहे. मुंबईत आज (शनिवार) विजयी मेळावा होत आहे. काही मराठी कलाकार या मेळाव्यासाठी दाखल होत आहेत. जे कलाकार या मेळाव्यासाठी येणार नाहीत, त्यांच्याविषयी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नाराजी व्यक्त केली आहे.