राज्यात उन्हाचा चटका वाढला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 September 2018

पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून उर्वरीत राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे.  

राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भात ढगाळ हवामान, पावसामुळे घसरलेला पारा पुन्हा पुन्हा वर सरकला आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. सोलापूर, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३३ अंशाच्या वर गेले आहे. तर जळगाव, परभणी, वर्धा येथे ३२  अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. रात्रीच्या किमान तापमान सरासरीच्या खाली असले तरी त्यात वाढ झाली आहे. 

मॉन्सूनला जोर राहिला नसल्याने राज्यात पाऊस थांबला आहे. रविवारी सकाळपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरीत राज्यात कोरडे व अंशत: ढगाळ हवामान होते. पावसाला पोषक हवामान नसल्याने पावसाची उघडीप कायम राहणार आहे. आज (ता. १०) मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी एखाद दुसरी पावसाची सर पडण्याचा अंदाज आहे. तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

रविवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.३ (१८.६), जळगाव ३२.६ (२०.४), कोल्हापूर २८.९(१९.५), महाबळेश्‍वर १९.०(१५.२), मालेगाव ३१.०(२१.४), नाशिक २७.५(१९.५), सांगली ३०.०(१८.१), सातारा २८.१(१९.५), सोलापूर ३३.० (२०.१), सांताक्रुझ ३१.१(२३.९), अलिबाग ३१.७(२४.३), रत्नागिरी २९.३(२२.७), डहाणू ३०.३(२५.४), आैरंगाबाद ३०.७ (१८.६), परभणी ३२.३(१९.५), नांदेड ३०.०(२२.०), अकोला ३२.४२(२०.०), अमरावती ३०.८(१९.४), बुलडाणा २९.२ (१८.८), चंद्रपूर ३३.६ (२१.४), गोंदिया ३०.०(२२.५), नागपूर ३१.४(२०.३), वर्धा ३२.०(१९.९).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temperature increase in state