esakal | राज्यात उन्हाचा ताप वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature

मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुढील काळात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) राज्यात आकाश ढगाळ राहून, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात उन्हाचा ताप वाढणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुढील काळात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) राज्यात आकाश ढगाळ राहून, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्य प्रदेश आणि कर्नाटक किनारपट्टीलगत दोन चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या दोन्ही स्थिती दरम्यान, महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानात वाढ होत असली तरी किमान तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी (ता. २) उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस, अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याचे कमाल तापमान, उकाड्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. 

loading image
go to top