
गोंडपिपरी : चंद्रपूर-अहेरी मार्गावरील गणपूर जवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना आज ( शुक्रवार ) सहा वाजेच्या दरम्यान घडली. ओव्हरटेक करण्याचा नादात अपघात झाल्याच्या सांगितले जातात.