चार लाख नागरिकांची चाचणी; पुणे विभागातील कोरोनाची स्थिती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

पुणे विभागात दोन हजार 263  रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक हजार 60  रुग्ण गंभीर आहेत. विभागात बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 57.98  टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के इतके आहे.

पुणे - विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी 4 लाख 1 हजार 387 व्यक्तींच्या घशांतील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी 3 लाख 95 हजार 178 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी तीन लाख 13 हजार 956 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह, तर सहा हजार 209 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 80 हजार 405 झाली आहे. त्यापैकी 46 हजार 620रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 522 इतकी आहे. पुणे विभागात दोन हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक हजार 60 रुग्ण गंभीर आहेत. विभागात बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 57.98 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के इतके आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हानिहाय स्थिती (शनिवारी दुपारपर्यंत) : 
पुणे जिल्हा : 
बाधित रुग्ण : 65 हजार 591 
बरे झालेले रुग्ण : 40 हजार 45 
ऍक्‍टीव रुग्ण : 23 हजार 927 
मृत्यू : 1 हजार 619 

सातारा जिल्हा : 
बाधित रुग्ण : 2 हजार 973 
बरे झालेले रुग्ण : 1 हजार 603 
ऍक्‍टीव रुग्ण : 1 हजार 270 
मृत्यू : 100 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोलापूर जिल्हा : 
बाधित रुग्ण : 6 हजार 834 
बरे झालेले रुग्ण : 3 हजार 331 
ऍक्‍टीव रुग्ण : 3 हजार 93 
मृत्यू : 410 

सांगली जिल्हा : 
बाधित रुग्ण : 1 हजार 327 
बरे झालेले रुग्ण : 462 
ऍक्‍टीव रुग्ण : 822 
मृत्यू : 43 

कोल्हापूर जिल्हा : 
बाधित रुग्ण : 3 हजार 680 
बरे झालेले रुग्ण : 1 हजार 179 
ऍक्‍टीव रुग्ण : 2 हजार 410 
मृत्यू : 91 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testing of four lakh citizens Status of Corona in Pune Division