
TET Exam Fraud: नाशिकमधून पावणेतीन हजार परीक्षार्थींना केले पात्र
पुणे : शिक्षक पात्रता परिक्षेत (टीईटी) सात हजार ८८० अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवून त्यांना पात्र करण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभागातील सर्वाधिक दोन हजार ७७० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले असल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यात मालेगाव येथून पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३३, रा. भाईगाव रोड, मालेगाव, जि. नाशिक) अशी कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी संतोष हरकळ याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एक हजार २७० परीक्षार्थींची यादीतील एक हजार १२६ परीक्षार्थी व त्यांचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा: Exams: एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
यातील अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी गुण वाढविण्यात आलेल्या यादीतील कोणकोणत्या परीक्षार्थींना आरोपी मुकुंद सूर्यवंशी याने संपर्क केला आहे याचा तपास करायचा आहे. आरोपीने शिक्षक पात्रता परिक्षा २०१९-२० च्या परिक्षेत त्याने अशा प्रकारे किती अपात्र परीक्षार्थींना गैरमार्गाने पात्र केले आहे का? तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या इतर दलालांचा शोध घेणे यासाठी सूर्यवंशी यास सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथम न्यायदंडाधिकारी एस.जी. डोलारे यांनी आरोपीस १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे.
Web Title: Tet Exam Fraud Nashik Three Thousand Candidate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..