मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती-आघाड्यांवरुन चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज अचानक भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र शिवसेना (ठाकरे) पक्षाने या भेटीनंतरही मनसेसोबत चर्चा करण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे.