Maharashtra PoliticsSakal
महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Politics : युतीसाठी ठाकरे सकारात्मक : संजय राऊत
Sena MNS Alliance : राज ठाकरे यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे शिवसेना-मनसे युतीसाठी थेट चर्चा होणार असून कोणताही औपचारिक प्रस्ताव नसेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई : ‘‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेमधील युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही. हा प्रस्तावाचा खेळ नाही. राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हे दोन्ही नेतेच थेट चर्चा करतील,’’ अशी भूमिका शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केली.