Sushama Andhare : आईचं काळीज... सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट व्हायरल

अंधारे यांच्या लेकीचा वाढदिवस असूनही त्यांना वेळेत पोहोचता आलं नाही
Sushama Andhare
Sushama AndhareEsakal

व्यक्ति कितीही कठोर वागत असला किंवा बोलत असला तरी त्याची काही ना काही दुखरी बाजू असतेच. अशाच आपल्या कणखर भाषणाने विरोधकांची गोची करणाऱ्या आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्यांची फायर ब्रँड अशी ओळख असणाऱ्या सुषमा अंधारे याही यावेळी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

कुटुंबीयांच्या आनंदाच्या आणि दु:खाच्या क्षणामध्ये कुटुंबीयांसोबत नसल्यामुळे मनाची घालमेल होते. ठाकरे गटाच्या रणरागिणी आणि कणखर लढाऊ नेत्या सुषमा अंधारे यांची अवस्थाही अशीच काहीशी झाल्याचं त्यांनी सांगितलं. अंधारे यांच्या लाडक्या लेकीचा म्हणजे कब्बूचा वाढदिवस असूनही त्यांना तिच्या जवळ वेळेत पोहोचता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनाची घालमेल झाली. ही घालमेल त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे. मनाला हेलावणारीच अशीही पोस्ट आहे.

Sushama Andhare
Maharashtra Assembly Budget Session 2023 2024: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट

शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरु आहेत.. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय.पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय.. दिड दोन तासांपूर्वी चा कणखर लढावू बाणा गळून पडलाय... समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघुन "पराधीन जगती पुत्र मानवाचा " या ओळींची यथार्थता अनुभवतेय.12 वाजलेत...लेकीचा वाढदिवस आहे.. आत्ता या क्षणाला मी तिच्या सोबत असायला हवं..

Sushama Andhare
‘RTE’ प्रवेश १ मार्चनंतर! १,०१,८८१ विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

अर्थात् नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कूठे आहे म्हणा..?पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा...! आत्ता जी मनाची घालमेल होतेय ती कदाचीत फक्त Rupali Patil Thombare ही मैत्रिणच समजू शकेल..! कारण 11 फेब्रुवारीला तिच्या विरूचा वाढदिवस होता. कब्बुपेक्षा फक्त 16 दिवसांनी मोठा आहे तो.. अन् त्याच्या वाढदिवसाला ईच्छा असूनही कामामुळे रूपाली पोचू शकत नव्हती. वरुन कीतीही खमकेपणा दाखवला तरी त्यादिवशी फ्लाईट मध्ये तिचा रडवेला चेहरा अन् आरक्त डोळे तिच्यातल्या व्याकूळ आईचं काळीज डोकावत होतं...

असो भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.. याक्षणी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे. लेकीचा वाढदिवस शिवसैनिक मामा शहरप्रमूख Anand Goyal Gajanan Tharkude - गजानन थरकुडे Nilesh Jathar Akshay Sagar Malkar हे सगळे आहेतच त्यामुळे फिकर नॉट...

Love you pillu... Mumma loves you lot..

Wish you a very happy birthday Shona...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com