

Maharashtra News
esakal
ठाणे:प्रशासनाने अमान्य व प्रलंबित वनहक्क दावे हे केवळ कागदावरील आकडे म्हणून पाहू नयेत. प्रत्येक प्रलंबित दाव्यामागे एक कुटुंब, त्यांचे जगणे आणि त्यांचे भविष्य दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक दाव्याकडे संवेदनशीलतेने, न्यायाच्या दृष्टीने आणि कालमर्यादेत पाहून निर्णय घ्यावा,” असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी प्रशासनाला दिले.