Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray
Raj ThackeraySakal

Thane Loksabha election 2024 : शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ठाण्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रयोग केला. राज यांनी सुषमा अंधारे यांचा बाळासाहेब ठाकरेंवरील टीकेचा व्हिडीओ दाखवला.

भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले की, बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांचं सगळ्यात जास्त प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. आधी ग्रामपंचाय, नंतर नगर परिषद, नंतर महानगर पालिका.. असं चक्र सुरु आहे. हे सगळं ठरतं ते लोकसंख्येवरुन. बाकीच्या जिल्ह्यात एखादी महानगर पालिका असते. परंतु ठाण्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. बाहेरचे लोंढे थांबवले नाहीतर तर कितीही रस्ते केले, पूल बांधले तरी काहीही फरक पडणार नाही. मेट्रो आणली तरी कमीच पडणार आहे. मूळ माणसाच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी दिल्लीत गेल्यानंतर हे लोंढे थांबवा, असं सांगितलं पाहिजे.

राज ठाकरे म्हणाले की, मी ही पहिली लोकसभेची निवडणूक बघतोय, या निवडणुकीला विषयच नाही. त्यामुळे सगळेजण एकमेकांचा उद्धार करताना दिसून येत आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचे मुद्दे निवडणुकीत आले पाहिजेत, परंतु तसं होत नाही. 'माझे वडील चोरले' अशा मुद्द्यावर निवडणुका होत आहेत.

उद्धव ठाकरेंना टार्गेट करत राज ठाकरे म्हणाले की, आज जे बोलतायत आमचा पक्ष फोडला.. आमचा पक्ष फोडला, याच उद्धव ठाकरेंनी आमचे नगरसेवक खोके देऊन फोडले होते. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी. पुलोदचं सरकार आणलं ते त्यांनीच. शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली.. त्यानंतर नारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्यासोबत आमदार फोडले.

Raj Thackeray
Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

''उद्धव ठाकरे तुम्ही, माझे वडील चोरले.. माझे वडील चोरले म्हणताएत ना मी एकच क्लिप दाखवतो.'' असं म्हणत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ, असं म्हटलं आणि सुषमा अंधारेंचा व्हिडीओ सुरु झाला. व्हिडीओमध्ये अंधारे म्हणातएत की, ८०-८५ वर्षांच्या म्हताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग.. हात थरथरथर कापायला लागलेत... काय उपयोग.'' ही जुनी क्लिप राज ठाकरेंनी पुन्हा दाखवली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, याच बाईंना उद्धव ठाकरेंनी पक्षाचं उपनेतेपद दिलंय. भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसता.. आणि बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे असं म्हणता? असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्न उपस्थित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com