Thane Ring Metro: मेट्रोचा आराखडा बदलणार?; उपवन औद्योगिक क्षेत्राचे विस्थापन टळण्याची शक्यता

Proposal to Revise Thane Ring Metro Route: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्यात बदल होण्याची शक्यता असून लोकमान्यनगर, उपवन औद्योगिक क्षेत्र आणि नागरिकांचे संभाव्य विस्थापन टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव पुढे आला आहे.
Thane Ring Metro

Thane Ring Metro

esakal

Updated on

ठाणे: ठाणे शहरातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्यात फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित मार्गामुळे लोकमान्यनगर परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबे तसेच उपवन औद्योगिक क्षेत्राचा काही भाग बाधित होणार असल्याची बाब समोर आल्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. या सूचनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो प्राधिकरणाला आवश्यक फेरबदलांचा विचार करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सरनाईक यांनी मंगळवारी (ता. ४) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com