
वेल्हे : किल्ले राजगड पायथा पाल बुद्रुक (ता.राजगड) येथे राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने ,शाहिरी पोवाडे, शिवकालीन मर्दानी खेळ, पालखी मिरवणूक, पारंपरिक वाजंत्री, ढोल ताशाच्या निनादाने राजगडाची दरी-खोरी दुमदुमून गेली होती. रविवार (ता.१२) रोजी जिजाऊंच्या ४२७ व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला.