Vitthal Statue History : पुरातत्त्व विभाग करणार मूर्तींचा अभ्यास ; विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडलेल्या मूर्तीसंदर्भात आज बैठक

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील तळ घरात सापडलेल्या मूर्ती पुरातत्व विभाग आपल्या ताब्यात घेणार असून या मूर्तींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे अशी माहिती आहे.
Vitthal Statue History
Vitthal Statue Historysakal

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील तळ घरात सापडलेल्या मूर्ती पुरातत्व विभाग आपल्या ताब्यात घेणार असून या मूर्तींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे अशी माहिती आहे. दरम्यान या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता. २) मंदिर समितीची तातडीची बैठक बोलवण्यात आली, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी आज दिली.

येथील विठ्ठल मंदिरातील हनुमान द्वाराजवळ तळ घर सापडले आहे. पुरातत्व विभागाने पाहणी केली असता तळघरामध्ये विष्णूच्या दोन आणि महिषासुरमर्दिनीच्या रूपातील एक अशा प्रमूख तीन मूर्ती सापडल्या आहेत. या बरोबरच दगडी पादुका, जुनी नाणी, बांगड्या आढळून आल्या आहेत.

येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. या दरम्यान मंदिरात चार बाय सहा फूट आणि आठ फूट खोलीचे तळघर सापडले आहे. याच तळघरात पुरातन अंशता भग्न पावलेल्या दगडी मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. या मूर्ती विषयी कुतहूल वाढले आहे.

तळघरात सापडलेल्या सर्व मूर्ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून त्यावर आणखी संशोधन आणि अभ्यास केला जाणार आहे. मंदिरात सापडलेल्या मूर्ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यायच्या कि मंदिरात ठेवायच्या या बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. या संदर्भात उद्या दुपारी मंदिर समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मूर्ती बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सापडलेल्या मूर्ती पुरातत्व विभाग आपल्या ताब्यात घेणार की मंदिर समिती आपल्याकडेच ठेवणार याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com