'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी'; १० सप्टेंबरला मनसेची स्वच्छता मोहीम

'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी'; १० सप्टेंबरला मनसेची स्वच्छता मोहीम
esakal
Updated on

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट करत उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.(The campaign apala samudra kinara, apali jababadari will be implemented mns Amit Thackeray )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट करत अमित ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार संकल्पनेनुसार १३ समुद्र किनाऱ्यांवर 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची सांगितले.

काय आहे ट्विटमध्ये?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार १३ समुद्र किनाऱ्यांवर उद्या शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० दरम्यान 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

तसेच या ट्विटमध्ये कोणत्या समुद्र किनारी ही मोहीम राबवण्यात येणार आहे याचीदेखील माहिती देण्यात आली आहे. गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा, उरण, वर्सोली, नागाव, आलिबाग, मुरूड आणि मांडवी या समुद्रकिनारी आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी मोहिम राबवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com