तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेत का? निर्बंध झाले आणखी कडक

तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेत का? निर्बंध झाले आणखी कडक
covid vaccine
covid vaccinee-sakal
Summary

राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख 35 हजार व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे अपेक्षित आहे.

सोलापूर : राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख 35 हजार व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेणे अपेक्षित आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला (Vaccination) सुरवात झाली, तरीही दीड कोटी व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही. सध्या राज्यात एक कोटींहून अधिक डोस शिल्लक असतानाही लोक लस टोचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तिसऱ्या लाटेत हेच लोक कोरोनाचे वाहक ठरतील, या भीतिपोटी त्यांच्यावरील निर्बंध कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra State Government) घेतला आहे. (The corona restricted vaccine is now mandatory for all citizens)

मुंबई (Mumbai), पुणे (Pune), भंडारा (Bhandara), सिंधुदुर्ग (Sindhudurg), नागपूर (Nagpur), रायगड (Raigad), सातारा (Satara), गोंदिया (Gondia), रत्नागिरी (Ratnagiri), कोल्हापूर (Kolhapur), वर्धा (Wardha), सांगली (Sangli), चंद्रपूर (Chandrapur), ठाणे (Thane), पालघर (Palghar), औरंगाबाद (Aurangabad), अमरावती (Amravati), वाशिम (Washim), नाशिक (Nashik), बुलढाणा (Buldhana), उस्मानाबाद (Osmanabad) या जिल्ह्यांतील 80 टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्‍तींनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. अजूनही नगर (Nagar), जालना (Jalna), अकोला (Akola), सोलापूर (Solapur), यवतमाळ (Yawatmal), धुळे (Dhule), परभणी (Parbhani), जळगाव (Jalgaon), लातूर (Latur), गडचिरोली (Gadchiroli), हिंगोली (Hingoli), बीड (Beed), नांदेड (Nanded) व नंदूरबार (Nandurbar) या जिल्ह्यातील 80 ते 90 लाख व्यक्‍ती लसीकरणापासून दूरच आहेत. दुसरीकडे, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण होऊनही 23 जिल्ह्यांमधील लोक दुसरा डोस घेत नसल्याची बाब समोर आली आहे.

100 टक्‍के लसीकरणातूनच कोरोनाची तिसरी लाट थोपवू शकतो, असा विश्‍वास आरोग्य विभागाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असल्याने सर्वांनी प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, या हेतूने लस न घेतलेल्यांवरील निर्बंध वाढविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या आहेत. लस न टोचलेल्यांना वैयक्‍तिक संपर्क करून 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून लस टोचावी, असेही आदेश सरकारने दिले आहेत.

लसीचे दोन्ही डोस न घेतल्यास...

  • विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाहीच; खासगी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दोन डोसचे बंधन

  • मॉल, सर्व दुकानांमध्ये लसीच्या प्रमाणपत्राशिवाय नो एन्ट्री

  • सार्वजनिक वाहनातून प्रवासावर निर्बंध; खासगी वाहनचालकांवरही होणार दंडात्मक कारवाई

  • लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच मिळणार पेट्रोल, डिझेल

  • मद्यपींनाही दोन डोस टोचल्याशिवाय मिळणार नाही वाईन

  • शासकीय, खासगी कार्यालयांसह बॅंकांमध्येही मिळणार नाही प्रवेश

  • बंधने कायदेशीर नाहीत, तरीही लस घ्यावीच लागेल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वांनीच लस घेतली आहे. कायदेशीर जरी नसले तरीही, सर्वांच्या सुरक्षिततेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्‍यक आहे.

- राजेश टोपे (Rajesh Tope), आरोग्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com