
बैलगाडा शर्यत : बिनजोड बादशाह! महाराष्ट्र गाजवणारे तगडे खोंड
बैलगाडी शर्यतीतील सध्याचे टॉप बैल (Top bull in the Bullock Cart Race):
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील (Supreme Court) बंदी हटवल्यानंतर सबंध महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत प्रेमी आनंदून गेले आहेत. बंदीच्या काळात होत असलेल्या 'बिनजोड शर्यतीमध्ये हुकमी एक्के ठरलेले एक से बढकर एक बैल सध्या महाराष्ट्रात आहेत. लवकरच मानाची 'हिंदकेसरी' मैदाने सुरु होतील आणि खरे हिंदकेसरी बैल समोर येतील. परंतु सध्याच्या सिझनमध्ये बिनजोडचे बादशाह ठरलेले किंवा ज्यांना बैलप्रेमी 'महाराष्ट्र किंग' म्हणून संबोधतात अशा काही टॉप चॅम्पियन बैलांविषयी (Champion Bulls) आपण बोलणार आहोत.

1. मथूर (Mathur)- खिलार (Khilar) म्हैसुर क्रॉस जातीचा मथूर हा देखणा खोंड खऱ्या अर्थाने बैलगाडी शर्यतीतील बादशाह आहे. राहूल पाटील (अडवली -मुंबई) यांच्या मालकीचा 'कोसा' रंगाचा मथूर बैलगाडी शर्यतीतील खऱ्या अर्थाने चॅम्पियन
2. दबंग (Dabang)- दोन जीवघेण्या अपघातातून वाचूनही महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत दबंगची हवा आहे. दबंगच्या शरीरावर जागोजागी जखमांचे असलेले टाके पाहिले की तो कोणत्या परिस्थितीतून गेलाय, याची कल्पना येते. दावणीवर शांत वाटणाऱ्या, रस्त्याने निवांत चालणाऱ्या दबंगला छकड्याला ( शर्यतीत वापरली जाणारी बैलगाडी) जुंपताच त्याच्या अंगात वीज संचारते. कोसा रंग असलेला हा खिलार (म्हैसूर क्रॉस) तगडा खोंड साताऱ्यातील आसनगाव येथील विनोद कळंबे आणि सोमनाथ पवार यांच्या मालकीचा आहे.
3. महाकाल (Mahakal)- महाकाल हा नावाप्रमाणेच इतर बैलांसाठी शर्यतीत महाकाल ठरतो. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बैलांना मात देण्याची किमया महाकालने केली आहे. अमित पाटील (सुपणे) तसेच राहूल पाटील (मुंबई) यांचा महाकालसुद्धा कोसा रंगाचा म्हैसूर खिलार क्रॉस जातीचा बैल आहे.

4. सरदार (Sardar)- सरदारसाठी बैलगाडी शर्यत हे युद्धच असते आणि त्याला ते युद्ध जिंकायचं असते. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीतील बैलांमध्ये सरदारचा दरारा आहे. बैलगाडी प्रेमी समीर भोईर(मोठा गाव, मुंबई) यांच्या मालकीचा हा बैलही कोसा रंगाचा म्हैसूर खिलार क्रॉस जातीचा बैल आहे.
5. मोन्या (Monya)- ज्याला बैलगाडी माहीत आहे, त्याला मोन्या माहीत असणारचं! भल्या भल्या बैलांना नमवणारा मोन्याची शर्यत डोळ्यांच पारणं फेडणारी असते. निखिल भोईर (मुंबई) यांच्या मालकीचा हा म्हैसूर खिलार क्रॉस जातीचा बैल निश्चितच चॅम्पियन आहे.
6. भारत (Bharat)- अनेक शर्यतीत दरारा असणाऱ्या भारतने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर दरारा आहे. सोबतचा बैल कोणताही असो, भारत शर्यत जिंकणारच अशीच त्याची ख्याती आहे. उत्तम गवळी यांच्या भारतची म्हणूनच महाराष्ट्रभर चर्चा असते.
7. वायर (Wire)- पांढराशुभ्र, देखण्या आणि तगड्या शरीरयष्टीच्या वायरमध्ये बेकार करंट असल्याचं शर्यत प्रेमी सांगतात. त्याच्या या करंटपुढे दुसऱ्या बैलांचं काहीच चालत नाही. अनेक शर्यती जिंकणारा तानाजी झांबरे यांचा वायर खिलार जातीचा बैल आहे.

8. सुंदर (Sundar)- नावाप्रमाणेच सुंदर असणारा सुंदर शर्यतीत धावताना मात्र भयानक असतो. महाराष्ट्रातील सध्याच्या चॅम्पियन बैलांची लिस्ट सुंदर शिवाय पुर्ण होऊ शकत नाही. सुभाष मांगडे, (कात्रज-पुणे) यांचा खिलार बैल बिनजोडचा बादशाह आहे.
9. सर्जा/राजा/बादल (Sarja, Raja and Badal)- एक खरा बैलगाडी शर्यत प्रेमी म्हणून ओळख असणारे पंढरीनाथ फडके यांच्या सर्जा, राजा आणि बादल या तिन्ही बैलांना महाराष्ट्रात तोड नाही. महाराष्ट्रात असा एक बैल नसेल, ज्यांना सर्जा, राजा आणि बादलने आपला हिसका दाखवला नाही. सर्जा, राजा, बादल हे बैल शर्यतीला उतरतात, ते जिंकण्यासाठीच.
10. मेहबूब-सुलतान (Mehboob and Sultan): राधे इंटरप्रायझेसची मेहबूब-सुलतान ही जोडी बैलगाडा शर्यतीतील किंग जोडी आहे. बिनजोडचे बादशाह असणारे मेहबूब आणि सुलतान यांची मैदानात इंट्री झाली की शर्यतीत वर्चस्व राखणारच. प्रत्येक बैलगाडी प्रेमीच्या हृदयात मेहबूब सुलतान या जोडीचं नाव कोरलं गेलंय.
11. सर्जा (लासा) (Sarja or Lasa)- अनेक बिनजोड शर्यतींचा मानकरी ठरलेला सर्जा चॅम्पियन बैल आहे. सर्जाच्या रेस पाहणे निश्चितच रोमांचक असतं. मातब्बर बैलांना पराभूत करून सर्जाने आपले नाव निर्माण केलंय. धनाजी शिंदे (सैदापूर-कराड) हे या बैलाचे मालक आहेत.

12. इंजान (Enjan)- नावाप्रमाणे इंजान बैल आहे की त्याच्यात एखादे इंजिन बसवलंय हे कळत नाही. इंजाननं अनेक शर्यतीत प्रतिस्पर्धी बैलांचा घाम काढला आहे. (गांधारी-मुंबई)
13. बब्या (Babya)- शिस्तीचा बादशाह म्हणून ओळख असलेला बब्या हा बैल, फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या मालकीचा आहे. अगदी दोन वर्षाच्या मुलानंजरी सोडलं तरी शिंग न हालवणारा अतिशय शांत, संयमी हा बैल शर्यतीत मात्र इतर बैलांना जवळपास पण फिरकू देत नाही. बब्याची बैलगाडी शर्यतीत प्रचंड दहशत आहे.
14. शंभू 7878 (Shambhu 7878)- शंभूच्या नावात जरी 7878 असलं तरी शर्यतीत मात्र तो नंबर 1 आहे. अतिशय तगडा आणि चपळ आहे. एखाद्या मोठ्या स्पोर्ट कारलाही लाजवेल असा पिकअप असलेला हा बैल खऱ्या अर्थाने बिनजोडचा बादशाह आहे.
(टीप- ही सर्व माहिती बैलगाडी शर्यतीतील जाणकारांकडून मिळवली आहे. वरील सर्वच बैल तुल्यबळ असून या यादीमध्ये आणखी काही बैलांची नावं राहिल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तुम्हाला असे आणखी काही बैल राहिले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. )