दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून लागू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ४ मेपासून शिक्षकांच्या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे.
Pune School Controversy

Pune School Controversy

sakal

Updated on

सोलापूर : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (SCERT) इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून लागू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ४ मेपासून शिक्षकांच्या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना उपस्थित राहण्याचे बंधन आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२६ पासून सुरू होत आहे. त्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. हे प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. राज्यस्तरासाठी ४ ते ७ मे २०२६ (मराठी व उर्दू माध्यम), जिल्हास्तर ११ ते १४ मे २०२६ (मराठी व अन्य माध्यम) व तालुकास्तर प्रशिक्षण १८ ते ३० मे २०२६ (मराठी व अन्य माध्यम) रोजी आयोजित केले आहे.

उर्दू माध्यमासाठी हे प्रशिक्षण केवळ राज्य आणि जिल्हा अशा दोनच स्तरांवर आयोजित केले जाणार आहे. सहसंचालकांनी सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (DIET) या संदर्भात जिल्हास्तर सुलभकांची नावे त्वरित कळवण्याचे आदेश दिले आहेत. नवीन अभ्यासक्रम वर्गात शिकवताना शिक्षकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे.

प्रशिक्षण कालावधी आणि स्वरूप

इयत्ता दुसरीच्या शिक्षकांसाठी ३ दिवसांचे, तर तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी ४ दिवसांचे प्रशिक्षण निश्चित करण्यात आले आहे. मराठी, उर्दू आणि इतर सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी स्वतंत्र किंवा समन्वयाने प्रशिक्षणाची सत्रे घेतली जातील. विशेष म्हणजे, दुसरीच्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी असला तरी, प्रशिक्षणाची सुरुवात मात्र सर्व वर्गांसाठी एकाच तारखेला होणार आहे.

अंमलबजावणीसाठी ‘या’ सूचना

SCERT चे सहसंचालक यांनी सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (DIET) या संदर्भात जिल्हास्तर सुलभकांची नावे त्वरित कळवण्याचे आदेश दिले आहेत. नवीन अभ्यासक्रम वर्गात शिकवताना शिक्षकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com