The Kashmir Files: चित्रपट करमुक्त करण्याची आ. नितेश राणेंची मागणी

आज विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही हा मुद्दा उपस्थित करत माहीती दिली आहे.
चित्रपट करमुक्त करण्याची आ. नितेश राणेंची मागणी
चित्रपट करमुक्त करण्याची आ. नितेश राणेंची मागणीSakal

मुंबई : बहुचर्चित 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९८० ते १९९० च्या दरम्यान काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांकडून झालेला पंडितांवर आत्याचार या चित्रपटातून दिग्दर्शक विवेक मल्होत्री यांनी दाखवला आहे. कर्नाटकसह, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांत हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात यासंदर्भात सरकारकडून काही निर्णय घेतला गेलेला नाही.

दरम्यान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच आज विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांना एका सभागृहात नेऊन हिंदू जनजागृती करण्याचं काम केलं जातं असा आरोपही त्यांनी केला. या मागणीनंतर झुंड चित्रपटही करमुक्त करा अशी मागणी काहीजणांकडून होते असंही ते म्हणाले. त्यामुळे या चित्रपटाला करमुक्त करण्यात येणार नसल्याची माहीती त्यांनी दिली.

नितेश राणेंनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलंय की, जम्मू काश्मिरमध्ये मुस्लिम दहशतवाद्यांनी हिंदूंवर अनन्वित आत्याचार केले. या गोष्टीचे योग्य आणि खरे चित्रिकरण या चित्रपटात केलं आहे, म्हणून हा चित्रपट सरकारने करमुक्त करावा. 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पहावा यासाठी सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

हा चित्रपट विवेक मलहोत्री यांनी दिग्दर्शित केला असून झी स्टुडिओ आणि अभिषेक अग्रवाल आर्टस् हे निर्माते आहेत. त्याचबरोबर मुख्य भुमीकेत अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी हे आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेतली असून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com