Shivsena : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे अन् आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल

दहिसर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांचा रात्रभर गोंधळ
Shivsena
Shivsena Esakal

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मध्यरात्री गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. पण विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी शिवसैनिकांसह शीतल म्हात्रे यांनी केली. तर शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. यासंदर्भात पोलीस कारवाई करत आहेत.

दहिसरमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या रॅलीसाठी आले होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत या रॅलीत सहभागी झाले. मात्र, अज्ञात व्यक्तींनी रॅलीतील एक व्हिडीओ एडीट केला आहे.

Shivsena
Satish Kaushik Death: कौशिक मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण! पतीने हत्या केल्याचा महिलेचा खळबळजनक दावा

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या व्हिडीओमध्ये अश्लील मजकूर लिहून तो व्हायरल करण्यात आला. या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तात्काळ तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोधही सुरू केला आहे.

दरम्यान हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. दहिसर पोलिसांनी तक्रार नोंदवून एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते. शीतल म्हात्रे यांनी मातोश्री नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

Shivsena
होळीच्या दिवशी गैरवर्तनाला बळी पडलेल्या जपानी तरुणीची प्रतिक्रिया, म्हणाली 'Loves India'

या मॉर्फ व्हिडीओची माहिती मिळताच आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे हा मध्यरात्री कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी त्यांनी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. तसेच मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com