

solapur crime
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : शहरातील लष्कर परिसरातील मुर्गी नाल्याजवळ राहायला असलेल्या आयुब हुसेन सय्यद या तृतीयपंथीचा तिघांनी खून केला. दागिन्यांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. तृतीयपंथीच्या घरातून चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले असून, त्यात एक लाख ८९ हजारांचे दागिने खरे असून, अर्धा किलो दागिने बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने तिन्ही संशयितांना ५ जानेवारीपर्यंत वाढीव पोलिस कोठडी ठोठावली आहे.
संशयित आरोपी आफताबने २६ डिसेंबरला तृतीयपंथी आयुबला फोन करून २७ डिसेंबर रोजी मित्र यशराज कांबळे भेटायला येणार असल्याचे सांगितले होते. २७ डिसेंबर रोजी यशराज सोलापुरात आला. त्याला आयुबने एसटी स्टँडवरून घरी आणले. त्या रात्री यशराज आयुबच्या घरी थांबला होता. आयुब झोपल्यावर यशराजने इन्स्टाग्रामवर मेसेज करून आफताब इसाक शेख व वैभव गुरुनाथ पनगुले यांना बोलावून घेतले. आफताब किक बॉक्सिंग शिकला होता. आयुबला बेशुद्ध करण्यासाठी त्याने त्याच्या उजव्या गालावर जोरात किक मारली; पण तो बेशुद्ध न होता मार लागल्याने उठला आणि जोरजोरात ओरडू लागला. आजूबाजूचे जागे होतील, ४० किलो दागिने चोरीचा प्लॅन फसेल म्हणून त्यांनी आयुबचे तोंड दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी आयुबच्या खालच्या खोलीची चावी घेतली. त्या ठिकाणी त्यांना सापडलेले दागिने बॅगेत भरले.
तसेच इंटरनेटचा राउटर, एसीचा कंडेन्सर, आयुबचा मोबाईल, सीसीटीव्हीचा डीव्हीआरही बॅगेत टाकला. त्याची दुचाकी घेऊन तिघेही पसार झाले. खुनाची माहिती मिळताच सदर बझार पोलिस व शहर गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या शोधासाठी लातूरच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी संशयितांना सहा तासांतच जेरबंद केले. आता त्यांनी चोरलेले दागिने, रोकड, जाळून टाकलेले अवशेष जप्त केले आहेत. पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करीत आहेत.
टोल नाक्याच्या अलीकडे थांबले अन्...
लातूरला जाताना वाटेतील टोल नाका पास करण्यापूर्वी त्यांनी दोन्ही दुचाकीच्या नंबरप्लेट काढून वाटेत फेकून दिल्या. पुढे उजनी गावाजवळील महावितरणच्या एका ट्रान्सफॉर्मरजवळ खड्डा करून चोरलेले दागिने व ५३ हजार ७३० रुपयांची रोकड लपविली. तपासात पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. पण, त्यांनी नेमके किती दागिने चोरले, त्यातील किती दागिने खरे होते, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, तिघांनीही आधी आयुबचा खून केला. त्यानंतर खालच्या खोलीत चोरी करून तिघेही पुन्हा आयुबच्या खोलीत गेले. त्याच्या हातातील घड्याळ, कानातील बाळी, हातातील चांदीच्या अंगठ्या घेतल्या आणि ते पसार झाल्याचीही बाब समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.