कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपयांचा भाव! सोलापूर बाजार समितीत मंगळवारी ३६८ गाड्यांची आवक; आज लिलाव राहणार बंद
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ३१) कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला. मंगळवारी बाजार समितीत ३६८ गाड्या कांद्याची आवक होती. मागील १५ दिवसांपूर्वी सरासरी भाव प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपये होता.
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ३१) कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला. मंगळवारी बाजार समितीत ३६८ गाड्या कांद्याची आवक होती. मागील १५ दिवसांपूर्वी सरासरी भाव प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपये होता.