Govinda Reservation | गोविंदांना वेगळं आरक्षण नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadanvis

गोविंदांना वेगळं आरक्षण नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देऊ केले आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या घोषणेला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांना वेगळं आरक्षण नाही खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.(The reservation for Govinda in the sports quota was cleared by Deputy Chief Minister Fadnavis)

गोविंदांना पाच टक्क्याचा आरक्षण नाही. सर्व प्रकारच्या खेळाडूंना पाच टक्क्याच आरक्षण आहे. खेळाडूच दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानकं तयार होतील. एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेलं म्हणून आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. ज्या सुविधा इतर खेळातील खेळाडूंना लागू असतात त्या सर्व सुविधा आता गोविंदांनाही लागू असतील. तसेच, राज्य सरकारने खेळाडूंना नोकऱ्यांमध्ये दिलेल्या ५ % आरक्षणाचा लाभ गोविंदांनाही मिळणार आहे. असे मुख्यमंत्री शिंदें यांनी म्हटलं आहे.

Web Title: The Reservation For Govinda In The Sports Quota Was Cleared By Deputy Chief Minister Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..