महापौर अन्‌ नगरसेवकांचाच रस्ता ६ वर्षांपासून नादुरुस्त! सोलापूर शहरातील ‘एमआयडीसी’तील कलावती नगर, सुनील नगर, नीलम नगराकडे जाणारे नागरिक, शाळकरी मुलांचे हाल

‘आमचा दादा महापौर झाला, आता प्रभाग १२ मधील नागरिकांचे सगळेच प्रश्न सुटतील. रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज जोडणी, नागरिकांना पुरेशा दाबाने नियमित पाणी मिळेल, नागरी आरोग्य केंद्रातून आरोग्याची सोय होईल आणि चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या होतील’, अशा नागरिकांच्या अपेक्षा आहेत. मात्र, सहा वर्षे झाली, सुनील नगर, कलावती नगर, नीलम नगर, आशा नगराकडे जाणारा रस्ता दुरुस्त झालेला नाही.
solapur city

solapur city

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : ‘आमचा दादा महापौर झाला, आता प्रभाग १२ मधील नागरिकांचे सगळेच प्रश्न सुटतील. रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज जोडणी, नागरिकांना पुरेशा दाबाने नियमित पाणी मिळेल, नागरी आरोग्य केंद्रातून आरोग्याची सोय होईल आणि चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या होतील’, अशा नागरिकांच्या अपेक्षा आहेत. मात्र, सहा वर्षे झाली, सुनील नगर, कलावती नगर, नीलम नगर, आशा नगराकडे जाणारा रस्ता दुरुस्त झालेला नाही. याच रस्त्याने नगरसेवकदेखील ये-जा करतात, तरीदेखील त्याचे काम झाले नसल्याची खंत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

सोलापुरातील एमआयडीसीतील प्रिसिजन कंपनीसमोरील रस्ता पुढे आशा नगर, कलावती नगर आणि सुनील नगर, नीलम नगराकडे जातो. त्याठिकाणी जवळच आयुर्वेदिक रस शाळा आहे. त्या रस्त्यावर सहा वर्षांपूर्वी खड्डे पडले, पण दुरुस्ती कोणीच केली नाही. ड्रेनेज लाइन तुंबल्याने या रस्त्यावर पाणी येते. ड्रेनेज पाइप टाकले, पण त्याला कनेक्शनच दिलेले नाही. आता लोकवस्ती वाढली, तरीदेखील तो रस्ता दुरुस्त केला जात नाही. प्रभागातील नगरसेवक विनायक कोंड्याल महापौर झाल्याने नागरिकांना त्यांच्याकडून न सांगता कामे होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, कलावती नगराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर उन्हाळ्यातदेखील सांडपाण्याचे डोह साचलेले असतात. त्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली आहे.

महापौर, नगरसेवकही तेथून जातात, तरीही...

माजी नगरसेवक राजेश अनगिरे, विद्यमान महापौर विनायक कोंड्याल हे देखील याच रस्त्यावरून जातात. नागरिकांची मागणी आहे, लोकांनी मोठ्या आशेने निवडून दिले आहे. आता सारिका खजुरगी यांच्या माध्यमातून प्रयत्न करतो. या रस्त्याने परिसरातील नागरिक, शाळकरी मुले, एमआयडीसीतील कामगार दररोज ये-जा करतात, तरीदेखील तो रस्ता दुरूस्त झालेला नाही. पाच-सहा वर्षांपासून तो रस्ता नादुरुस्त आहे.

- जगदीश कुमसगी, आशा नगर, सोलापूर

तो रस्ता लवकरच होईल

‘एमआयडीसी’ला ५६ कोटींचा निधी मिळाला, यात तो रस्ता आहे. या निधीतून तो रस्ता तातडीने व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तो रस्ता खूप वर्षांपासून खराब झालेला असून नागरिकांना खरोखर तेथून जाताना त्रास होतो. पण, आगामी काळात हा रस्ता चकाचक केला जाईल.

- सारिका खजुरगी, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com