
राज्यात दोन अडीच महिन्यापूर्वी शिंदे-फडवणीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (the second cabinet expansion of the shinde government is likely to take place by october 5 )
शिंदे-भाजप सरकारचा दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रीमंडळ विस्तार येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.
पितृपंधरा संपल्यानंतर लगेचच मंत्रीमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहे. याआधी विस्तार रखडल्याने भाजपमुळेच नव्याने विस्तार होण्यात अडचणी असल्याचे शिंदे गटातील आमदारांनी मत व्यक्त केलं आहे.
गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक मंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवामध्ये ठिकठिकाणी दौरे केले. त्यानंतर तरी आता नवे मंत्री कामाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. मात्र, तसे झाले नाही. पितृपंधरवड्याच्या धास्तीने १८ पैकी १३ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारलेला नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. विस्तार २४ ऑगस्टला झाला आहे. मात्र अनेक मंत्र्यांनी अजूनही कारभार स्विकारलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.