
नाशिक : भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात वामनदादा कर्डकांच्या क्रांतिगीताने संविधान शाहिरीच्या माध्यमातून उजाळा दिला. संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य गणेशभाई उन्हवणे यांच्या अध्यक्षतेखाली व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांच्या शाहिरी कवन गीतांनी जलसा बहरला.
लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी वामनदादा कर्डकांच्या ‘बाय भीम, माझा लढला व लढला वं लढला रणा मधी’ हे गीत सादर केले. प्रा. शेजवळ यांनी ‘तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय, समाजचं काय रं गड्या समाजाचं काय?’ व ‘दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायडावर एक चवदार तळ्यावर’ ही गीते सादर केली. कविवर्य विनायक पठारे यांनी ‘उजाड राणी किमया केलीस मोठी भीमा तुज प्रणाम कोटी कोटी’ व ‘अंबर नीला समंदर नीला, निली तेरी निशाणी है’ हे गीत सादर करून लोकमने जिंकली. स्वागताध्यक्ष शशीभाऊ उन्हवणे यांनी ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे गीत सादर केले. सिद्धांत बागूल यांनी ‘नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेउ टिळा मंजुळा पाझळ आपला विळा चल गं रणा मधी’ हे गीत सादर करून तरुणांना प्रेरित केले.
तुषार पुष्पदीप यांनी ‘गाठोडं ज्ञानाचं व पुस्तकांचं चालले मी रणामधी’ हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावरील गीत सादर केले. शाहीर किरण निकम यांनी फुले, सावित्रींच्या जीवनकार्यासह महापुरुष, राष्ट्रमाता, पित्याच्या कार्याचा गौरव करणारी गीते सादर केली. त्यात ‘रोज नमन करते तु त्या खोट्या सरस्वतीला, सांग कशी ग विसरली माझ्या आई सावित्रीला’, किरण मंगल, उत्तम निकम, गीतकार संविधान सखूबाई मधुकर गायकवाड, गायक दुशांत वाघ यांनी ‘भीमा तुझी जनता भोळी, गोड गोड मधाची पोळी’ हे गीत, तर चंद्रमनी पटाईत यांनी ‘असा तुझा गोड गळा’ हे गीत सादर केले.
सहगायिका स्वाती त्रिभुवन, हरीश भालेराव (बँजो), योगेश मोरे (ढोलक), ऋतिक चव्हाण (तबला), माधवराव गायकवाड (हार्मोनिअम) यांनी साथसंगत केली. किशोर ढमाले यांनी प्रास्ताविक केले. शरद शेजवळ यांनी सूत्रसंचालन केले. शशीभाऊ उन्हावणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.