

solapur univercity
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर स्मारक दर्जेदार व्हायला हवे, सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी समितीच्या सदस्यांना दिली होती. २०२३ मध्येच लोकार्पणाचे नियोजन होते. त्यावेळीच ९० टक्के कामे झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. शासनाने १४ कोटींचा निधी वेळेत देऊनही २०२६ मधील जुलै संपला तरीदेखील अद्याप काम अर्धवटच आहे. सुधारित अंदाजपत्रक देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून विद्यापीठाला दिलेले नाही.