सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या सुमारे दोन ते अडीच हजार सराईत गुन्हेगारांची नोंद आहे. जामिनावर सुटल्यानंतरही अनेक जण गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. काही गुन्हेगार परजिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने चोरी, घरफोडी व अन्य गुन्हे करीत असल्याची माहितीही यापूर्वी समोर आली आहे.
solapur city police

solapur city police

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील चोरी, घरफोडी, एटीएम चोरी, खून, खुनाचे प्रयत्न आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. रात्री ११ ते शुक्रवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे १०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. रेकॉर्डवरील १३७ सराईत गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी २६ जणांवर विविध कायद्यांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या सुमारे दोन ते अडीच हजार सराईत गुन्हेगारांची नोंद आहे. जामिनावर सुटल्यानंतरही अनेक जण गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. काही गुन्हेगार परजिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने चोरी, घरफोडी व अन्य गुन्हे करीत असल्याची माहितीही यापूर्वी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली.

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची पाहणी करून त्यांच्या हालचालींची पडताळणी करण्यात आली. संशयास्पद हालचाली, कायद्याचे उल्लंघन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता महिन्यातून एक ते दोन वेळा अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन असे...

  • पोलिस ठाणे तपासलेले गुन्हेगार

  • फौजदार चावडी १५

  • जेलरोड ११

  • एमआयडीसी १८

  • जोडभावी पेठ १०

  • सदर बझार १३

  • विजापूर नाका २१

  • सलगर वस्ती १२

  • गुन्हे शाखा ३७

  • एकूण १३७

दोघांकडे गांजा, तडीपार केलेले, अस्तित्व लपविणारे १५ सापडले

सोलापूर शहर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांकडे गांजा तथा अन्य अमली पदार्थ आढळले. दोघांना पोलिसांनी, कोर्टाने वारंवार नोटीस देऊनही हजर न राहणारे दोघे यावेळी सापडले. प्रतिबंधित हत्यार तथा वस्तू घेऊन फिरणारा एकजण सापडला. चार वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. दारू बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवरही पोलिसांनी यावेळी कारवाई केली.

कारवाई केलेले गुन्हेगार

  • कलम १२२ : गुन्हा केल्यानंतर अस्तित्व लपवून वावरणारे आठ जण सापडले आहेत.

  • कलम १२४ : तिघांकडे काही दागिने, रोकड होती, पण त्याबद्दल त्यांना पुरावे देता आले नाहीत.

  • कलम १४२ : पोलिस आयुक्तालयाने तडीपारीची कारवाई करुन देखील दोघेजण शहर हद्दीत सापडले.

  • कलम ११०/११७ : मध्यरात्री संशयितरीत्या फिरताना आढळलेल्या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com