esakal | राज्यातील डीएड शिक्षकांवर होणार अन्याय...का ते वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील डीएड शिक्षकांवर होणार अन्याय...का ते वाचा... 

डीएड शिक्षकांनी घ्याव्यात हरकती 
शासनाने कायद्याचा सुधारणा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये डीएड धारक शिक्षकांवर पुन्हा अन्याय केला आहे. त्यामुळे डीएड धारक शिक्षकांनी याबाबत 23 जूनपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष हर्षल मानकर, कार्याध्यक्ष किशोर उजाडे, सचिव ज्ञानेश्‍वर माठे यांनी राज्यातील शिक्षकांना केले आहे. 

राज्यातील डीएड शिक्षकांवर होणार अन्याय...का ते वाचा... 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः एखाद्या प्राथमिक शिक्षकाने उच्च शैक्षणिक अहर्ता धारण केली असेल. परंतु, नियुक्ती ही प्राथमिक स्तरासाठी असेल तर तो शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरासाठीच्या सेवाजेष्ठता सूचीसाठी दावा करू शकणार नाही. त्याची उच्च शौक्षणिक अर्हता केवळ अतिरिक्त पात्रता राहणार आहे. त्याबाबतचा मसुदा शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यावर 23 जूनपर्यंत सूचना, हरकती मागविल्या आहेत. या नव्या मसुद्यामुळे डीएड शिक्षकांवर अन्याय होणार असल्याची भावना त्या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 

राज्यातील खासगी शाळांच्या कर्मचाऱ्यांसेवा शर्ती अधिनियम 1977 नुसार राज्य शासनाने अधिनियम 1981 मध्ये सुधारणा केली आहे. खासगी शाळेतील कर्मचाऱ्यांना नोकरीत लागल्यानंतर सेवाज्येष्ठतेसाठी नियुक्तीनंतर ज्या कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक आणि व्यावसाईक अर्हता वाढविली आहे, त्या कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता प्रवर्गानुसार ग्राह्य धरण्यात येणार आहे. एकाच शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाची सेवाजेष्ठता स्वतंत्रपणे धरण्यात येईल. प्रवर्ग क हा पूर्वीप्रमाणे असून यामध्ये उच्च पदवी, पदवी, तसेच 10 वर्ष सेवापूर्ण करणारे विषय शिक्षक, पदविका शिक्षक तसेच बीएसह पाच वर्ष हिंदी विषय किंवा सनद पूर्ण करणारे वरिष्ठ शिक्षक तसेच 10 वर्ष हिंदी विषय शिकवणारे कनिष्ठ शिक्षक यांचा प्रवर्ग क मध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय प्रवर्ग क मध्ये समावेश होण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसाईक अर्हता धारण करणे आवश्‍यक आहे. त्या प्रवर्गातील जेष्ठता ही त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून त्या प्रवर्गात ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय जर इतर (प्राथमिक, उच्च प्राथमिक) प्रवर्गातील शिक्षकांना वर्ग ड मध्ये समाविष्ट करताना त्यांची सेवाजेष्ठता नियुक्ती दिनांकानुसार न घेता ती शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. या प्रवर्गात पूर्वीपासून असणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच सेवाजेष्ठता क्रम ग्राह्य धरण्यात येणार आहे असेही शासनाने त्या मसूद्यात म्हटले आहे. 


 

 
 

loading image
go to top