Solapur: चिमुकल्यांवरील ‘या’ ५ संस्काराला आयुर्वेदात मोठे महत्त्व; रोगप्रतिकारक शक्तीही वाढले अन्‌ समजेल बाळाची प्रगती

मुलं जन्मल्यानंतर १० दिवसापासून ते साधारणतः: एक वर्षापर्यंत आयुर्वेदात पाच महत्त्वाचे संस्कार महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यात पहिल्यांदा ‘जातकर्म’ संस्कार सांगितला आहे. त्यानंतर नामकरण, निष्क्रमण, कर्णवेधन व अन्नप्राशन संस्कार सांगितले आहेत.
Solapur News
Solapur Newssakal

Solapur News : आयुर्वेदात अनेक आजारांवरील ठोस उपाय सांगितले असून अध्यात्मातून मुक्ती, भारतीयातून ऊर्जा कशी मिळते, त्याचे महत्त्व देखील विशद केले आहे. मुलं जन्मल्यानंतर १० दिवसापासून ते साधारणतः: एक वर्षापर्यंत आयुर्वेदात पाच महत्त्वाचे संस्कार महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यात पहिल्यांदा ‘जातकर्म’ संस्कार सांगितला आहे.

त्यानंतर नामकरण, निष्क्रमण, कर्णवेधन व अन्नप्राशन संस्कार सांगितले आहेत. चिमुकल्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्या संस्कारांना महत्त्व असून त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे.

प्रत्येकांनी या संस्काराचे महत्त्व जाणून त्यानुसार कृती केल्यास निश्चितपणे भविष्यातील व्याधींवर सहजपणे मात करण्याची ताकद चिमुकल्यांना मिळू शकते, असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.

बालकांवरील महत्त्वाचे ५ संस्कार

१) जातकर्म संस्कार

बाळ जन्मल्यानंतर आईपासून त्याला वेगळे केल्यावर कोरडे करून लाईटखाली ठेवणे आणि लवकर आईचे दूध पाजणे. आवश्यक मिनरल, इमिनोग्लोबिन, व्हिटॅमिन असतात आणि त्यातून आयुष्यभराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

पहिल्या तीन दिवसात अंगावर पाजतात. वारंवार आजारी पडत नाही. अशक्त बालकांसाठी अष्टांगसंग्रह या ग्रंथात मंत्र चिकित्सा सांगितली आहे. बाळाच्या उजव्या कानात त्याच्या वडिलांनी सकारात्मक बाबी बोलणे अपेक्षित आहे. जेणेकरून ते बाळ जगण्यासाठी सक्षम होऊ शकते, असे त्यात सांगितले आहे.

---

२) नामकरण संस्कार

मुल जन्मल्यानंतर साधारणतः: दहा दिवसांनी बाळाचे नामकरण करावे, असे सांगितले आहे. मुलाची वाढ व त्याचे आरोग्य कसे आहे, याची खात्री त्या दिवसात होते. त्यानंतरच नामकरण करून त्याला नाव तथा ओळख द्यावी, असे आयुर्वेदातील काश्यपसंहितेत सांगितले आहे.

बाळ आजारी, अशक्त असताना त्याला ओळख दिल्यास त्याच्याशी अनेकजण जोडले जातात. अशावेळी बाळाचे बरेवाईट झाल्यावर अनेकांना दु:ख होऊ शकते, हा त्यामागील मुख्य हेतू आहे.

---

३) निष्क्रमण संस्कार

बाळाला तीन महिने झाल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर तेही मंदिरात नेले जाते. मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारचे लोक दर्शनासाठी आलेले असतात. लोकांकडून पाहून बाळ गालात हसते. त्याला ‘सोशल स्माईल’ म्हणतात.

अशावेळी तीन महिन्यातील बाळाची वाढ व्यवस्थित असल्याची खात्री होते. दुसरीककडे मंदिरातील घंटा वाजल्यानंतर बाळ त्याकडे मान वळवून बघते. त्यावेळी त्याने मान धरल्याची खात्री होते.

---

४) कर्णवेधन संस्कार

बाळाचा जन्म होऊन चार ते सहा महिने झाल्यावर त्याच्यावर कर्णवेधन संस्कार केले जातात. त्यामागे सुरक्षेची भावना (प्रोटेक्शन) व सौंदर्य अशी दोन कारणे आहेत. कानावर अशा ठिकाणी पहिल्यांदा जखम केली जाते, जिथे रक्तप्रवाह किंवा रक्तस्राव जास्त होत नाही.

तीन-चार दिवसांत ती जखम भरून येते. पण, भविष्यात त्याला अशा जखमा झाल्या तर त्याच्या वेदना सहन करण्याची व ती बरी होण्याची ताकद त्याच्यात निर्माण व्हावी म्हणून कान टोचण्याचा संस्कार केला जातो.

---

५) अन्नप्राशन संस्कार

बाळ जन्मल्यानंतर पहिले सहा महिने त्याला आईचे दूध पाजणे खूप महत्त्वाचे आहे. त्यातून बाळाला आयुष्यभराची रोगप्रतिकारक शक्ती मिळते. सहा महिन्यानंतर बाळाला फल प्राशन (द्रव रस) करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. दात येत असताना पेस्ट स्वरूपातील पदार्थ खायला द्यावेत आणि एक वर्षांनी बाळाला थोडे थोडे इतर पदार्थ खायला देणे अपेक्षित आहे.

तत्पूर्वी, बाळाला त्या काळात अन्न पचन होण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाची खूप गरज असते. फळांमधून ते जीवनसत्त्व मिळते म्हणून आयुर्वेदात सहा महिन्यानंतर फल प्राशन सांगितले आहे. त्यामुळे बाळाला भविष्यात पचनसंबंधीचे आजार उद्‌भवत नाहीत, हा त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.

संस्कारो$ही नाम गुणान्तरधानम्‌...

आचार्य काश्यप (काश्यपसंहिताकार) व आचार्य वाग्भट (अष्टांगसंग्रहकार) तसेच वेद, हिंदू शास्त्रातील गुह्यसूत्रांमध्ये लहान बालकांमध्ये वयाच्या विशिष्ट टप्प्यावर त्याच्या चांगल्या गुणांचे वर्धन (वाढ) करण्यासाठी संस्कारांचे वर्णन केले आहे.

हे संस्कार वयाच्या वाढीचे टप्पे व बालकांची वाढ, विकास व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे असल्याची माहिती शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com