esakal | Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीचे 'हे' 40 जण असणार स्टार प्रचारक
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे.

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीचे 'हे' 40 जण असणार स्टार प्रचारक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अनिल देशमुख, शेतकरी नेते अण्णा डांगे, आमदार राजेश टोपे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार माजिद मेमन, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, वर्षा पटेल, आमदार प्रकाश गजभिये, आमदार किरण पावसकर, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार रामराव वडकुते,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, शब्बीर विद्रोही, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, नरेंद्र वर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, नसीम सिद्दीकी, शेख सुबान अली, अविनाश धायगुडे, प्रदीप सोळंके, सुषमा अंधारे, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर आदींचा यामध्ये समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे सदस्य व पक्षाचे स्थायी राष्ट्रीय सचिव एस. आर. कोहली यांनी प्रचारकांची ही यादी पक्षाच्यावतीने जाहीर केली आहे.