esakal | हे आहेत महायुतीचे 'सात' पराभूत मंत्री | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

हे आहेत महायुतीचे 'सात' पराभूत मंत्री | Election Results 2019

हे आहेत महायुतीचे 'सात' पराभूत मंत्री | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालाने सगळ्याच पक्षांना मतदारांनी सुचित इशारा दिला आहे. सत्ताधारी भाजप सेना युतीच्या 7 मंत्र्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागत  आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे आणि शिवसेनेचे नेते, मत्स्य आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. एक्झिट पोलमधून भाजप सेनेला मोठा विजय मिळेल असं वाटत असताना प्रत्यक्षात आलेला निकाल मात्र अनपेक्षित ठरला.

  1. या निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
  2. भाजपचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांची ही चौथी टर्म होती. ते लागोपाठ तीनवेळा निवडून आलेले बोंडे चौथ्यांदाही मोठ्या फरकाने निवडून येतील असं बोललं जात होतं. मात्र, मतदारांनी बोंडे यांना नाकारल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
  3. राजकारणात शरद पवारांचे नातू रोहित पवारांच्या एन्ट्रीमुळे कर्जत जामखेडची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. रोहित यांनी भाजपचे नेते आणि पालक मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
  4. आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचाही पराभव झाला आहे. साकोलीत भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले उभे होते.
  5. शिवसेनेचे दोन महत्त्वाचे मंत्री अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांचा पराभव झाला आहे. जालन्यातून खोतकर यांना काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला. खोतकर हे जालन्यातील मोठं प्रस्थ समजलं जातं. हा पराभव शिवसनेच्या जिव्हारी लागू शकतो.
  6. पुरंदरमधून शिवसेना नेते, राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री शिवतारे यांचाही पुरंदरमधून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारे यांचा पराभव केला आहे.
  7. शिवसेना नेते आणि रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमध्ये पराभव झाला आहे. माजी मंत्री अंबरिश अत्राम यांचाही पराभव झाला आहे.

Webtitle : these ministers of sena bjp faced allaiance faced defeate