Bharat Jodo:...हाच गांधीजी अन् सावरकर यांच्यात फरक; राहुल गांधींची संघावर जोरदार टीका

Rahul gandhi
Rahul gandhiSakal

नांदेड - काँग्रेसनेते राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो महाराष्ट्रात दाखल झाली असून आज नांदेडमध्ये त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी राहुल यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यावरूनही मोदींवर निशाणा साधला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही कडाडून टीका केली. (RAHUL GANDHI NEWS IN MARATHI)

Rahul gandhi
Missing Link Project: आशियातील सर्वात लांब बोगद्याचे ५५ टक्के काम पूर्ण; CM शिंदेकडून पाहणी

राहुल गांधी म्हणाले की, देशात तपस्वी जन्माला आले. त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे तपस्वी होते. या सर्वांनी तपस्या केली. या देशातील प्रत्येक मजूर, छोटा व्यापारी तपस्वी आहे. तर मोदी एक वेगळेच तपस्वी आहे. त्यांची तपस्या आश्रूंची आहे.

राहुल गांधी पुढं म्हणाले की, सध्या फक्त दोन तीन लोकांचं भल करण्यात येत आहे. शाळांमध्ये संगणक नाही. देशात पैशाची कमी नाही. पण संपूर्ण पैसा दोन-तीन लोकांना दिला जातो. जसं पाणी उपसण्यासाठी पंप असतो, तसा पंप मोदी सरकारने तुमच्या खिशावर लावल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.

Rahul gandhi
MNS On Sanjay Raut: सावरकर, टिळक स्वातंत्रसैनिक; तुमच्यासारखे…; मनसेची राऊतांवर चहुबाजुने टीका

यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएस आणि काँग्रेसच्या लोकांमधील फरक सांगितला. राहुल यांनी केदारनाथ दर्शनातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मला केदारनाथ येथे एक आरएसएसचे नेते भेटले होते. त्यांचं वजन साधारण १०० किलो असेल. दर्शन झाल्यावर त्यांना विचारलं काय मागितलं. तेव्हा ते म्हणाले की, मी चांगली प्रकृती मागितली. वास्तविक ते हेलिकॉप्टर ऐवजी चालत आले असते तर प्रकृती चांगली झाली असती. पण मी काही मागितलं नाही, मला रस्ता दाखवल्याबद्दल महादेवाचे आभार मानले. हा फरक आहे, सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा. हा फरक आहे काँग्रेस आणि आरएसएसमध्ये. आम्ही बोलत नाही, करतो, असंही राहुल यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com