Manoj Jarange : सिर्फ नाम ही काफी है; नाव 'मनोज' असेल तर 'या' हॉटेलमध्ये मिळेल मोफत जेवण

मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत.
those with name Manoj are being served free food in  hotel to show support Manoj Jarange Maratha Reservation
those with name Manoj are being served free food in hotel to show support Manoj Jarange Maratha Reservation

मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. जरांगे यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका मराठा बांधवाने अनोखा उपक्रम सुरू केला असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.

आपल्याकडूनही मनोज जरांगे यांना त्यांना समर्थन मिळावं असा विचार मनात घेऊन मनोज नावाच्या नागरिकांना मोफत जेवन दिलं जात आहे. बाळासाहेब भोजने असं हॉटेल मालकाचं नाव असून त्यांनी जरांगे यांचे नाव 'मनोज' असल्याने त्यांच्या नावकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असताना मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवली आहे.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती तर रास्तारोको सुरू होता. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू होते. याकाळात आगळ्या वेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना ठिकठिकाणी पाठिंबा दिला जात आहे.

those with name Manoj are being served free food in  hotel to show support Manoj Jarange Maratha Reservation
Maratha Reservation : 'खरं बोलयाचं झालं तर...'; सरकारला दिलेल्या मुदतीबद्दल जरांगे स्पष्टच बोलले

हॉटेल कुठे आहे?

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी चक्क एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांनी 'मनोज' नावाच्या व्यक्तीला त्याने आधार कार्ड दाखवून २३ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जात होते. त्यात वाढ करून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे.

those with name Manoj are being served free food in  hotel to show support Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange : ''वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या'', मनोज जरांगेंनी दिले दोन महिने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com