पुन्हा निर्बंध? नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? |omicron

corona
coronaesakal

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने या ठिकाणी धुमाकुळ घातला असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. त्याबाबत शास्त्रज्ञांनी या पूर्वीच धोक्याची घंटा वाजविली होती. दरम्यान आता यूरोप तसेच आफ्रिकन देशात जो कोरोनाचा (corona new variant) उद्रेक झालाय त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेय. कारण फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) धडकलीय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं महाराष्ट्राचीही चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं हाय अलर्ट जारी केला आहे. आता याचा महाराष्ट्राला कितपत धोका असू शकतो? तसेच पुन्हा निर्बंध लागू होणार का? अशा अनेक शंका नागरिकांच्या मनात उत्पन्न झाल्या आहेत.

लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला

कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर आता कुठे उद्योगधंदे पूर्वपदावर येत होते. त्यातच या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाल्यानं पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. राज्यात पहिला लॉकडाऊन झाल्यानंतर त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला होता. कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त उद्योगधंदे आहेत. लॉकडाऊन झाल्यानं उद्योगधंदे बंद झाले. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्याचा सर्वाधिक फटका बसला.

मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना

कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नव्या व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. पहिल्या लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारापर्यंत पोहोचत नव्हता त्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. लाखो रुपयांचा शेतमाल शेतात सडून गेला. त्यामुळे बळीराजा पुन्हा कर्जबाजारी झाला. गेल्या लॉकडाऊनचा पोल्ट्री व्यवसायलाही सर्वात मोठा फटका बसला होता. चिकन खाल्यानं कोरोना होतो अशा अफवा पसरल्यानं पोल्ट्री व्यवसायाचं मोठा नुकसान झालं होतं. काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं त्याचाही फटका अनेक उद्योधंद्यांना व्यापाऱ्यांना बसला.

महाराष्ट्राला आणि देशाला याचा किती फटका?

नव्या व्हेरिएंटचा फटका जागतिक बाजाराला तर बसलाच आहे, पण महाराष्ट्राला आणि देशाला याचा किती फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या लॉकडाऊननं छोट्या व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला होता, काहीजणांचे व्यावसाय जे बुडाले ते आजपर्यंत पुन्हा उभे राहिलेच नाहीत. आता कुठे कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्यानंतर नियम शिथील करण्यात आले होते. लोक घरातून बाहेर पडू लागले होते. कामधंदे पुन्हा सुरू झाले होते. आता या नव्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा निर्बंध लागणार का? तसेच आता कुठे सुरू झालेल्या व्यवसायाचं नेमकं काय होणार असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात घर करून आहेत

corona
Omicron ची दहशत : आज BMC ची महत्त्वाची बैठक,काही निर्णय होणार?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी गटाच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण दिवसाच्या पुनरावलोकनानंतर नवीन स्ट्रेनला “चिंताजनक प्रकार” घोषित केले आणि त्याला ग्रीक अक्षरात “ओमिक्रॉन” असे नाव दिले. या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आहेत, त्यापैकी काही ओमिक्रॉनशी संबंधित आहेत," डब्ल्यूएचओने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. "प्राथमिक पुरावे इतर प्रकारांच्या तुलनेत या संसर्गाचा पुन्हा होण्याचा धोका होण्याची शक्यता आहे. तरीही, व्हेरियंटच्या संक्रमणक्षमतेबद्दल मुख्य प्रश्न शिल्लक आहेत, ते लोकांना आजारी बनवू शकते का आणि ते लस टाळण्यास सक्षम होऊ शकते का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

corona
टोल नाक्यावर अजब प्रकार! Fastag बंदच्या नावखाली होेतेय लूट

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. या साऊथ अफ्रिकन व्हेरिएंमुळे सध्या ब्रिटनने देखी सहा देशांचा विमानप्रवास बंद केला आहे. याव्यतिरिक्त अन्य काही देशांमध्ये नवा व्हेरिएंट सापडल्याने तिसऱ्या लाटेची नांदी समजली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाच्या परिस्थितीवर तत्काळ बैठक बोलावली आहे. याच दरम्यान, मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी शासनाला विनंती केल्याचं समजतंय. दक्षिण अफ्रिकेतील विमानांचं नियमन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच जमल्यास या विमान प्रवासावर काही काळासाठी बंदी घालण्याचं आवाहन त्यांनी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com